बाजार विभाग

लेखा विभाग

लेखा विभाग :- दैनदिन व्यवहाराचे नोंदी टॅली सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करुन आर्थिक पत्रके तयार करणे तसेच बँक संबंधीत सर्व व्यवहाराचे कामकाज करणे. एकाआर्थिक वर्षात तीन अर्थसंकल्प पणन मंडळाकडे सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर तसेच विविध देय भरणा करणे. लेखा विभागा संबंधित सर्व काम-काज करणे.

संगणक विभाग

दैनंदिन बाजार भाव काढुन महाराष्ट्र राज्य ‍कृषि, पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, वार्षिक बाजार भाव भरणे.

आस्थापना विभाग

बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, रोजंदारी कामगार यांचे आस्थापना संबंधीत सर्व आदेश काढणे रजा खतावनी नोंदविने त्यांचे कामकाजाचे नियोजन करणे त्या संबंधीत सुचना पत्र देणे इत्यादी.

अनुज्ञप्ति विभाग

बाजार समिती मध्ये खालील प्रमाणे परवानाधारक आहेत.

अनु.क्र. अनुज्ञप्ति प्रकार एकुन अनुज्ञप्ति
1 अडते 124
2 खरेदीदार 86
3 प्रक्रिया (राईसमिल) 18
4 हमाल 08
5 मापारी 07

डिमांड विभाग

परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डवर खरेदी – विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड ‍ विभागात होते, व मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी या विभागांतर्गत होते.

अडत / खरेदी तपासणी विभाग

दैनंदिन अडत / खरेदी ‍बिलांची माहवार तपासणी केली जाते.

धान्य विभाग

धान्य विभागात शेतक-यांन मार्फत येणा-या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवानाधारक मापा-यां कडुन शेतमालाचे अचुक मोजमाप करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचा-यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टया देण्यात येते. शेतक-यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्यां कडून मिळते.

भाजीपाला विभाग

परवानाधारक अडते असुन विभागामध्ये भाजीपाला, आलु, लसन, कांदा, अद्रक व वारली मिर्ची व हिरवी मिर्ची चा व्यापार केल्या जातो. त्याकडुन सेवाशुल्कची आकारणी करुण वसुल केली जाते. बाजार समितीचे कार्यक्षेत्रात आलु, लसन ई. चे उत्पन्न होत नाही. बाजार समिती मध्ये आलु (बटाटा) कांदा हा मध्य प्रदेश व इतर ठिकाणातुन येतो.

दुकान भाडे विभाग

बाजार समितीमध्ये एकुण 53 दुकानगाळे असुन यापैकी 46 दुकानगाळे लिजभाडे तत्त्वावर दिलेले असुन उर्वरीत 07 दुकाने मासिक भाडयाने दिलेले आहे.

आवक जावक विभाग

दैनंदिन कार्यालयीन पत्रव्यवहाराचे आवक व जावक नोंद घेण्यात येते.