एपीएमसी बद्दल

रामटेक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्हयातील एक प्रसिध्द शहर आहे. राम वनवासात असतांना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूर पासुन 50 किलोमीटर वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पुर्वेला एक उंच डोंगर आहे. त्यावर प्रभु श्रीरामाचे सुमारे 600 वर्ष जुने मंदीर आहे एकुण आजुबाजुच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राममंदीर परिसरातच एक विशाल नंदी आहे. व श्रीगणेशाचे पुरातन मंदीर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. या ठिकाणी संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे “मेघदुत” कविकुलगुरु कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिलेले आहे. सन 1970-71 मध्ये रामटेक गडमंदीर परिसरात महाराष्ट्र शासनाने “कालिदास स्मारकाची ” निर्मिती केली आज या कालीदासाच्या नावाने येथे संस्कृत विदयापिठ सुरु आहे. या ठिकाणी दरवर्षी का‍लिदास महात्सव साजरा होत असतो. जवळच तोतलाडोह धरण आाहे. रामटेकच्या दक्षिणेला नगरधन येथे नंदीवर्धन किल्ला आहे. तसेच रामटेक येथे नागर्जुन टेकडी, अठराभुजा गणेश, खिंडसी तलाव, शांतिनाथ मंदीर अस्तित्वात आहे.

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या देशातील जनतेचा मुख्य् व्यवसाय शेती हाच होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जनता ही शेती उत्पन्नावर अवलंबून होती. त्यामुळे स्वातंत्रपूर्व काळामध्ये विकेंद्रित बाजार व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकरिता आठवडी बाजार अथवा बाजारहाट्ची जागा शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध होत्या.

रामटेक कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना दिनांक 19/10/1973 ला झालेली असुन सन 1985-86 ला रामटेक बाजार समितीमधुन विभाजीत होउन पारशिवनी तालुक्याकरीता वेगळी बाजार समिती निर्माण झाल्यामुळे तसेच दिनांक 24/12/2014 ला मौदा कृषि उत्पन्न बाजार समितीचे विभाजन झाल्यामुळे समितीचे कार्यक्षेत्र रामटेक तालुक्यात एकुण 157 गावे निर्धारीत करण्यात आलेली आहे. मा.श्री शंकररावजी कटकमवार, मा.श्री. सदाशिवजी नंदरधने, मा.श्री नंदकिशोरजी जयस्वाल, मा.श्री. रामभाउ धोंडे, मा.श्री. सदानंदजी निमकर, मा.श्री. अशोकजी बर्वे, मा.श्री.भगवानसिंगजी सेंगर, मा.श्री.लखनजी खंडाते, मा.श्री.विनोदजी हजारे,मा.श्री मोहनजी कोडवते,मा.श्री. रामचंद्रजी अडमाची, मा.श्री.डॉ. मनोजजी गायधने, मा.श्री. लक्ष्मणजी उमाळे, मा.श्री.नकुलजी बरबटे इत्यादी अनेक शेतकरी प्रतिनिधींनी या संस्थेचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. समितीने शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकरीता रामटेक येथील आवारात धान्य, भाजीपाला, गुरांचे बाजार तसेच समितीने देवलापार येथे उपबाजार सुरु केलेला आहे. विदयमान सभापती मा.श्री. सचिनजी किरपान व उपसभापती मा. सौ. लक्ष्मीताई कुमरे तसेच सर्व सन्माननिय संचालक गण- मा.श्री. विरेशजी आष्टणकर,मा.श्री. त्रिलोकचंदजी मेहर, मा.श्री.रामुजी झाडे, म.श्री. यशवंतजी भलावी, मा.श्री. झ्नकलालजी मरसकोल्हे, मा.श्री. नरेशजी मोहने, मा.श्रीमती साबेरा पठाण, मा.श्री. निलकंठजी महाजन, मा.श्री. रनविरजी यादव, मा.श्री.उमेशजी भांडारकर, मा.श्री. योगेशजी माथरे, मा.श्री. बाबुजी वरखडे, मा.श्री. भिमरावजी आंबिलढुके, मा.श्री. विजयजी मदनकर,मा.श्री. शंकरजी तांबुलकर यांच्यासह सदयस्थितीत सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी संचालक मंडळ कार्यरत आहे. बाजार समिती ही नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देवुन काम करीत आली आहे. व येणाऱ्या बदलांना समोर जाउन निश्चितच शेतकरी हित जपण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे.

नियंत्रित शेतीमाल

मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांनी वेळोवेळी शासकिय अधिसुचनेद्वारे कापुस (सरकी काढलेला व सरकी न काढलेला) ज्वारी, बाजरी,मका, कोथरा, तुर, चना, उडीद, सोयाबिन, मुंग, वाटाणा, तिळ, एरंडी, अंबाडी, गहु, धान, तांदुळ, चना, भुईमुंग, संत्रा,लिंबु, केळी, पेरु, कांदे, टोमॅटो, धने, मिरची (ओली व वाळली) बटाटे, पालेभाज्या, व भाज्या, रताळी ईत्यादी शेतमालाचे तसेच गुरेढारे, शेळयामेंढयांचे व मासे नियमन केले आहे.